मध्य प्रदेशात नर्मदा नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सुरु करण्यात आलेली ‘ नमामि देवी नर्मदे सेवा
यात्रेत’ नियमित सकाळी आणि संध्याकाळी नर्मदा नदीच्या तीरावर आरती केली गेली यात्रा जवळ जवळ
148 दिवस सुरु होती ह्यातील 50 वेळा मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान ह्यांनी आरती
केली. आर.टी. आय. ने दिलेल्या माहितीनुसार एका वेळेचा खर्च 58,650 दाखवण्यात आला आहे. तर एका
आरतीचा खर्च एवढा कसा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर हा खर्च असाच केला गेला असेल तर
आरती दिवसातून दोन वेळा होते म्हणजे दिवसाचा खर्च 1,18,000 रपये होतो म्हणजे 148 दिवसात हाच
खर्च 1,74,64,000 रुपये होतो. आपण फक्त मुख्यमंत्र्यांच्या आरतीचा खर्च जरी मोजला तरी हा खर्च
29,00,000 रुपये इतका होतो, म्हणून नर्मदा सेवा यात्रेत घोटाळा झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews